सुटीच्या दिवशीही विजेचा अपव्यय

म. टा. प्रतिनिधी, नागपूर अन्न, वस्त्र, निवाऱ्यासोबतच आता वीज ही प्रत्येकाच्या जीवनावश्यक गरजेत समाविष्ट झाली आहे. त्यामुळे या गरजेची पूर्तता करताना प्रत्येकाने भान ठेवावे, अशी जुजबी अपेक्षा असते. आधीच वीजटंचाईचे संकट सोसत असलेल्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात टंचाई भरून काढण्यासाठी १२ -१२ तासांचे भारनियमन केले जाते. त्यामुळे एकीकडे शेतातल्या पिकांना पाणी देण्यासाठीही वीज मिळत नाही. दर दुसरीकडे शहरांमध्ये मात्र सर्रासपणे विजेचा अपव्यय केला जातो. गरज नसताना अकारण वीज खर्ची करणे ही कृती अनैतिक ठरवून तो सामाजिक गुन्हा मानला जातो.

विद्यापीठ निवडणुका अखेर जुन्या कायद्यानुसार

म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अखेर विद्यार्थी संघाच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. या निवडणुका जुन्या कायद्यातील तरतुदीनुसार, मेरिटच्या पात्रतेवर होणार आहेत. त्यानुसार संलग्नित कॉलेजेसमध्ये २२ जानेवारीला विद्यार्थी संघाकरिता निवडणुका होतील. तर स्थापन झालेल्या विद्यार्थी संघातून कॉलेज प्रतिनिधींची निवडणूक २९ जानेवारीला होणार आहे. त्यानंतर विद्यापीठ विद्यार्थी संघाची स्थापना होणार आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात नमूद विद्यार्थी संघाच्या थेट निवडणुका न घेता जुन्या कायद्यानुसार, निवडणूक घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

निधी कमी पडणार नाही

म.टा. वृत्तसेवा, बुलडाणा संत चोखामेळा यांनी समाजावर उपकार केले आहेत. त्यांनी समाजाचे प्रबोधन करण्याचे महान कार्य केले आहेत. त्यांनी समाजाला चांगली शिकवण दिली. त्यामुळे त्यांच्या जन्मस्थळाचा विकास करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. त्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री दिलीपकुमार कांबळे यांनी दिली. संत चोखामेळा यांच्या साडेसातशेव्या जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार डॉ.

सत्यपाल महाराजांना संत चोखामेळा पुरस्कार

म.टा. वृत्तसेवा, गोंदिया राज्य सरकारने यंदापासून संत चोखामेळा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रबोधनकार, धार्मिक सलोखा जपणारे, समता, बंधुता सामाजिक न्याय, व्यसनमुक्ती अशा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. राज्याचा पहिला पुरस्कार अकोला जिल्ह्यातील सप्तखंजिरी वादक व प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांना देण्यात येणार असल्याचे, बडोले यांनी जाहीर केले. संत चोखामेळा यांच्या जन्मगाव मेहुणाचा विकास करण्यात येणार आहे.

नागपूर, भंडाऱ्यात बिबट ठार

म.टा. वृत्तसेवा, नागपूर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेमुळे भंडाऱ्यात एक बिबट्या ठार झाला. तर नागपुरातील उमरेड तालुक्यातील खुर्सापार येथे बिबट्याने शेतकऱ्यांवर हल्ला केला. आत्मसंरक्षणार्थ शेतकऱ्यांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात बिबट्याचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनांमुळे वन्यप्रेमींमध्ये खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांवर हल्ला, शेतकऱ्यांचा प्रतिहल्ला जागली करताना शेतकऱ्यांवर एका बिबट्याने हल्ला केला. यात दोन जणगंभीर जखमी झाले. स्वत:चा बचाव करीत असताना शेतकऱ्यांच्या हातून बिटट्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे उमरेड तालुक्यातील खुर्सापार शिवारात घडली.