फटाक्यांमुळे सोनिया गांधींनी भाषण थांबवलं

राहुल गांधी यांच्याकडे आज अध्यक्षपदाची सूत्रे सोपवल्यानंतर सोनिया गांधींचे भाषण सुरू असतानाच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. फटाके फोडल्याने सोनियांनी नाराजी व्यक्त केली आणि काही मिनिटे भाषण थांबवले.

'बेबीडॉल' सनी लिओनी पुन्हा छोट्या पडद्यावर

'एमटीव्ही'चा लोकप्रिय रिअॅलिटी शो 'स्प्लिट्सव्हिला'चं सूत्रसंचालन केल्यानंतर बॉलिवूडची 'बेबी डॉल' सनी लिओनी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परत येतेय. 'मॅन वर्सेस वाइल्ड'या शोचं सूत्रसंचालन सनी लिओनी करणार आहे.

भाजप नेते आज रात्री करणार 'घोटाळा': हार्दिक

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपवर टीकेची झोड उठवणारा पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल यानं आता मतदानानंतरही भाजपवर गंभीर आरोप केला आहे. शनिवार आणि रविवारी रात्री भाजपचे नेते मतदान यंत्रांमध्ये फेरफार करणार असल्याचा दावा त्यानं केलाय.

सवर्ण गरिबांना आरक्षण?; चाचपणीचे कोर्टाचे निर्देश

आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या उच्चवर्णीयांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याची गरज असल्याची महत्त्वपूर्ण सूचना मद्रास हायकोर्टाने तामिळनाडू सरकारला केली आहे. असे करता येईल का याबाबत अभ्यास करावा असे निर्देशही कोर्टाने सरकारला दिले आहेत. शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळावे यासाठी १४ विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने या सूचना केल्या आहेत. 'गरीब हा गरीब असतो, मग तो पुढारलेल्या जातीतील असो वा मागास जातीतील असोच, असेही कोर्टाने म्हटले आहे.

एअरटेलचा E-KYC परवाना तात्पुरता निलंबित

आधार कार्ड वितरीत करणारे प्राधिकरण 'UIDAI'ने भारती एअरटेल आणि एअरटेल पेमेंट्स बँकेविरुद्ध कडक कारवाई करत त्यांचा ई-केवायसी परवाना तात्पुरत्या स्वरुपात निलंबित केला आहे. या कारवाईनंतर एअरटेल आणि एअरटेल पेमेंट्स बँक आता ई-केवायसीद्वारे आपल्या मोबाईल ग्राहकांच्या सिमकार्डची आधार कार्डवर आधारित पडताळणी करू शकणार नाही.