#SaathChal प्लॅस्टिकबंदी, स्वच्छतेबाबत वारकऱ्यांत विनोदातून जागृती

वालचंदनगर - संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना जंक्‍शन (ता. इंदापूर) येथे प्लॉस्टिक बंदी, स्वच्छतेविषयी कला पथकाने विनोदातून संदेश दिला. 

मुंबईला जाणारा दुधाचा टॅंकर फोडला

इस्लामपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध संकलन बंदला आज वाळवा तालुक्‍यातील येवलेवाडी (ता. वाळवा) नजीक हिंसक वळण लागले. जिल्ह्यात पहिली ठिणगी पडली. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून मुंबईकडे निघालेल्या दुधाच्या टॅंकरच्या काचा स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी येवलेवाडीनजीक फोडल्या. दगडफेक करून टॅंकरच्या समोरच्या काचा फोडून टॅंकरमधील दूध रस्त्यावर सोडले. टॅंकर वारणा दूध संघाचा असल्याचे समजते.

मंत्री झोपेत; कार्यकर्ते राखणीला

नाशिक : राज्याचे पशूसंवर्धन व दूग्धविकास मंत्री महादेव जानकर हे खासगी दौऱ्यानिमित्ताने नाशिकला आले. त्यांची भेट घेऊन पक्षाच्या ध्येयधोरणासंदर्भात चर्चा करण्यासाठी कार्यकर्ते विश्रामगृहावर पोहोचले मात्र मंत्री महोदय आले तसे, एका खोलीत जाऊन झोपले. तब्बल साडेतीन तास थांबून राहिलेल्या कार्यकर्त्यांसाठी त्यांनी 10 मिनिटेही न देता सदिच्छा भेट देण्यासाठी निघून गेले. त्यांच्या या कार्यशैलीमुळे कार्यकर्ते मात्र चांगलेच नाराज झाले. 

#SaathChal सोपानदेवांच्या पालखीचे वडगावात स्वागत

वडगाव निंबाळकर - संत सोपानदेव पालखीचे नीरा-बारामती मार्गावरील वडगाव निंबाळकर, होळ, कोऱ्हाळे बुद्रुक गावांत उत्साहात स्वागत करण्यात आले. पालखीच्या दर्शनासाठी ठिकठिकाणी गर्दी झाली होती.

मदन‘बाण’ कोणाच्या भात्यात?

सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील वाक्‌संघर्षामुळे जिल्ह्यातील राजकीय तर्कवितर्कांच्या चर्चांना गेल्या काही दिवसांत ऊत आलेला आहे. यातच थकीत ऊस बिल प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर आता मदन भोसलेंचेही नाव त्यात सहभागी झाले आहे.
लोकसभेला भक्कम उमेदवार म्हणून भाजप त्यांना पुढे करणार, अशा या चर्चा आहेत. शिवाय उदयनराजेंना पर्याय म्हणून ते राष्ट्रवादीच्याही रडारवर आहेत. जिल्ह्याच्या राजकीय गर्भात काय अंकुरणार, हे निवडणुकीवेळीच समजणार असले, तरी या चर्चांमुळे राजकीय जाणकारांना पटाची मांडणी करायला नवा मुद्दा मिळाला आहे, हे नक्की.